Posts

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

Image
सहसा न्यायमूर्ती रानडे म्हटले म्हणजे आपल्याला रमाबाई रानडे यांची आठवण पटकन येते. उंच माझा झोका मधल्या लडिवाळ लहानग्या रमा आणि त्यांचा अभ्यास घेणारे रानडे आठवतात. आमच्या आयुष्यातील काही आठवणी या रमाबाईंनी लिहिलेल्या पुस्तकात रानडे भेटत राहतात. पण रानडे यांच्या विषयी आणखी काही वाचावे असे बऱ्याच दिवसांपासून वाटत होते. अलीकडे "रानडे- प्रबोधन पुरुष"  हे  डॉ. अरुण टिकेकर  यांचे पुस्तक हाती पडले आणि खुप आनंद झाला.   रानडे यांचा कालखंड १८४२ ते १९०१ असा आहे. लंडन युनिव्हर्सिटी च्या धर्तीवर १८५७ साली मुंबई युनिव्हर्सिटी ची स्थापना झाली. रानडे हे मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या ४ ग्रॅज्युएट मधील एक आणि प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झालेले होते. नाशिक धुळे पुणे आणि मुंबई उच्च न्यायालय येथे न्यायाधीश पदाचे काम अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी पहिले.  सामाजिक सुधारणा  सामाजिक आणि आर्थिक बंधनांमधून विधवा विवाह, बाल- जरठ विवाह, समुद्र प्रवासावरील बंदी, आंतरजातीय विवाह, लग्नात होणारी पैशांची उधळपट्टी, स्त्री शिक्षणातील समाजाची उदासीनता यावर वेळोवेळी प्रहार केले.  त्यांनी विधवा विवाह मंडळ, सार्वजनि

Trek to Makalu Base Camp: सफर मकालू बेस कॅम्पची

Image
मकालू हे जगातील सर्वात उंच असलेले पाचवे शिखर. वैनतेय संस्थेच्या राहुल सोनवणे याच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे नाशिककर मकालू पर्वताच्या बेस कॅम्प ला जाण्याचे ठरले. तयारीचे सगळे सोपस्कार पूर्ण करून आम्ही काठमांडू विमानतळावर पोहोचलो. आपल्याला घ्यायला टूर ऑपरेटर केशव थापा येणार आहेत हे सगळ्यांच्या तोंडून ऐकले होते. विमानतळावर बस स्टँड सारखी गर्दी व्हायला लागल्यापासून फलाटावरून उशीरा निघण्याचा बसचा गुणधर्म विमानांनीही शिकून घेतला होता. अर्थात केशव थापा मात्र अगदी प्रसन्न चित्ताने आमचे स्वागत करते झाले. नेपाळमध्ये विशेष महत्व असणाऱ्या पारंपरिक झेंडूच्या फुलांच्या माळा घालून आम्हाला गाडीने पशुपतीनाथ मंदिरात पाठविले.  विमानतळाच्या अगदी लगतच असणाऱ्या एका रस्त्याने आम्ही पशुपतीनाथ मंदिराच्या मागील बाजूस पाचदहा मिनिटात पोहोचलो. मंदिराच्या मागील बाजूस प्राचीन पण अरुंद पात्राची बागमती नदी वाहत होती तर पलीकडे अनेक चिता जळताना दिसत होत्या. हे अनपेक्षित दृश्य पचवून आम्ही पटकन मंदिराच्या मुख्य प्रांगणात दाखल झालो. वेळ संपल्याने दर्शन मिळणे शक्य नव्हते परंतु मंदिराचा परिसर थोडाफार न्याहाळता आला. पॅगोडा च्