Posts

Showing posts from March, 2024

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे

Image
सहसा न्यायमूर्ती रानडे म्हटले म्हणजे आपल्याला रमाबाई रानडे यांची आठवण पटकन येते. उंच माझा झोका मधल्या लडिवाळ लहानग्या रमा आणि त्यांचा अभ्यास घेणारे रानडे आठवतात. आमच्या आयुष्यातील काही आठवणी या रमाबाईंनी लिहिलेल्या पुस्तकात रानडे भेटत राहतात. पण रानडे यांच्या विषयी आणखी काही वाचावे असे बऱ्याच दिवसांपासून वाटत होते. अलीकडे "रानडे- प्रबोधन पुरुष"  हे  डॉ. अरुण टिकेकर  यांचे पुस्तक हाती पडले आणि खुप आनंद झाला.   रानडे यांचा कालखंड १८४२ ते १९०१ असा आहे. लंडन युनिव्हर्सिटी च्या धर्तीवर १८५७ साली मुंबई युनिव्हर्सिटी ची स्थापना झाली. रानडे हे मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या ४ ग्रॅज्युएट मधील एक आणि प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण झालेले होते. नाशिक धुळे पुणे आणि मुंबई उच्च न्यायालय येथे न्यायाधीश पदाचे काम अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांनी पहिले.  सामाजिक सुधारणा  सामाजिक आणि आर्थिक बंधनांमधून विधवा विवाह, बाल- जरठ विवाह, समुद्र प्रवासावरील बंदी, आंतरजातीय विवाह, लग्नात होणारी पैशांची उधळपट्टी, स्त्री शिक्षणातील समाजाची उदासीनता यावर वेळोवेळी प्रहार केले.  त्यां...