Trek to Makalu Base Camp: सफर मकालू बेस कॅम्पची
मकालू हे जगातील सर्वात उंच असलेले पाचवे शिखर. वैनतेय संस्थेच्या राहुल सोनवणे याच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे नाशिककर मकालू पर्वताच्या बेस कॅम्प ला जाण्याचे ठरले. तयारीचे सगळे सोपस्कार पूर्ण करून आम्ही काठमांडू विमानतळावर पोहोचलो. आपल्याला घ्यायला टूर ऑपरेटर केशव थापा येणार आहेत हे सगळ्यांच्या तोंडून ऐकले होते. विमानतळावर बस स्टँड सारखी गर्दी व्हायला लागल्यापासून फलाटावरून उशीरा निघण्याचा बसचा गुणधर्म विमानांनीही शिकून घेतला होता. अर्थात केशव थापा मात्र अगदी प्रसन्न चित्ताने आमचे स्वागत करते झाले. नेपाळमध्ये विशेष महत्व असणाऱ्या पारंपरिक झेंडूच्या फुलांच्या माळा घालून आम्हाला गाडीने पशुपतीनाथ मंदिरात पाठविले. विमानतळाच्या अगदी लगतच असणाऱ्या एका रस्त्याने आम्ही पशुपतीनाथ मंदिराच्या मागील बाजूस पाचदहा मिनिटात पोहोचलो. मंदिराच्या मागील बाजूस प्राचीन पण अरुंद पात्राची बागमती नदी वाहत होती तर पलीकडे अनेक चिता जळताना दिसत होत्या. हे अनपेक्षित दृश्य पचवून आम्ही पटकन मंदिराच्या मुख्य प्रांगणात दाखल झालो. वेळ संपल्याने दर्शन मिळणे शक्य नव्हते परंतु मंदिराचा परिसर थोडाफार ...