Posts

Showing posts from 2018

स्टॅनफोर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया Stanford University California

Image
स्टॅनफोर्ड विद्यापीठ, कॅलिफोर्निया  ८००० एकर विस्तीर्ण जागेमध्ये वसलेले स्टॅनफर्ड विद्यापीठ हे एक गावच आहे. येथील माजी विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या विविध आस्थापनांचा एकत्रित आकार  हा जवळपास २.७ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सएवढा प्रचंड. तर येथील विद्यार्थ्यांनी पटकावलेल्या ऑलिम्पिक पदकांची संख्या आपल्यास नक्कीच आश्चर्यचकित करून सोडेल.  कामा निमित्त सॅन-होजे सॅन-फ्रान्सिस्को परिसरात मागील वर्षी थोडी भटकंती झाली. या परिसराचा फ्लॅगशिप मॉन्युमेंट अर्थात गोल्डन गेट ब्रिज अनुभवला. या ब्रिज बरोबरील फोटो फेसबुक प्रोफाईल पिक्चर म्हणून टाके पर्यंत कॅलिफोर्निया वारी सफल होत नाही हे ऐकून असल्याने मी देखील तत्परतेने फोटो अपलोड केला. १९३७ साली बांधलेल्या गोल्डन गेटची भव्यता अनुभविणे हा देखील एक सुंदर अनुभव आहे पण त्याविषयी नंतर कधीतरी, आता आपल्या विषयाकडे वळूयात.  काम सांभाळून एके दिवशीची दुपार खास स्टॅनफर्ड व्हिजिट साठी राखून ठेवलेली. व्हिजिटर सेंटर मधील विद्यार्थ्यांनी आमचे हसतमुखाने स्वागत केले. आसपासचे फोटो बघता बघता १५ मिनिटे कशी गेली ते कुणालाच समजले नाही. व्हिजिटर से...